आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत पंचायत समिती मावळ द्वारे महावाचन

आज शनिवार दि. १२/०४/२०२५ रोजी जि. प. शाळा कान्हे, शाळेच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत पंचायत समिती मावळ द्वारे महावाचन हा उपक्रम राबवण्यात आला. सर्व विध्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पढ़ने से खुलते हैं, ज्ञान के सब द्वार, किताबों में छुपा है, दुनिया का संसार। बचपन से डालो, पढ़ने की ये आदत, सँवर जाएगा जीवन, होगी नई शुरुआत! वाचनाचे महत्त्व विध्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून आत्मसात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक प्रेमाचा वसा आणि वारसा समर्थपणे पुढे चालवावा.चांगली पुस्तके ही माणसाला कधी एकटे पडू देत नाही. वाचनामुळे मनाची वाढ होते आणि विचारांना एक वेगळी दिशा मिळते. हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सन्मा.श्री.के.के प्रधान साहेब यांच्या कल्पक प्रेरणेतून या उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी सन्मा.श्री. सुदाम वाळुंज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली. वडगाव बीटच्या विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख सन्मा. सौ निर्मला काळे मॅडम यांच्या प्रोत्साहनातून. शाळेच्या मुख्याध्यापिका कु.सुकेसिनी कोले मॅडम व सर्व शिक्षक यांनी यशस्वीपणे राबवला.

वडगाव मावळ येथे बारा तास महावाचन.. शासकीय कर्मचाऱ्यांचे महावाचन होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ..महावाचन

वडगाव मावळ येथे बारा तास महावाचन.. शासकीय कर्मचाऱ्यांचे महावाचन होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ.. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती मावळ येथे शासकीय कर्मचाऱ्यांचा बारा तास महावाचन हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमामध्ये सुमारे दीडशेहून अधिक शासकीय कर्मचारी व शिक्षक सहभागी झाले होते. सकाळी सहा ते सायंकाळी सहा या बारा तासांच्या काळात त्यांनी साहित्य, कला, विज्ञान तसेच महापुरुषांच्या चरित्र विषयक पुस्तकांचे वाचन केले. यावेळी आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ज्ञानदान पेटीचे उद्घाटन करण्यात आले. बारा तास वाचन झाल्यानंतर प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण आयुक्त श्री. विशाल सोळंकी, मा. सभापती गुलाबकाका म्हाळसकर, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, कृषी अधिकारी संताजी जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, नाना शेळकंदे, निर्मला काळे इ. मान्यवर उपस्थित होते. वाचकांच्या वतीने मनीषा गाडे व किरणकुमार काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. वाचनाने माणूस ज्ञान समृद्ध होतो. वाचनाचे आकलन करून मनन केले पाहिजे. वाचनाची सवय नेहमी कृतीत आणावी असे मत विशाल सोळंकी यांनी व्यक्त केले. महावाचन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी कविता पाटील, सहा. लेखाधिकारी दीपा साखरे, मनोहर कांबळे, दीपक राक्षे, शैला बुरकुले, जयश्री पाटील, नितीन रोकडे, सुनील राऊत,भोरकडे सर, मल्लिकार्जुन कांबळे यांनी संयोजन केले. तसेच कार्यक्रमाचे यशस्वी करिता पंचायत समितीतील सर्व अधिकारी ,कर्मचारी,परिचर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद तनपुरे यांनी तर आभार बाबासाहेब काळे यांनी मांडले
Scroll to Top